सोप्पी आणि चविष्ट डाळ बट्टी - मराठी
Simple and Delicious Dal Batti Recipe in Marathi by The Foodie Indians
बट्टी :
साहित्य :• गव्हाचे पीठ - २ वाट्या
• जाडा रवा - १ वाटी
• तेल गरम करुन - २ टेबलस्पून
• ओवा - १ टि स्पून
• खाण्याचा सोडा - ०.५ टि स्पून
• मीठ - चवीनुसार
• गरम पाणी (पिठ भिजवण्यासाठी)
• तेल (तळण्यासाठी)
कृती:
1. फक्त तेल आणि पाणी सोडुन वरिल सर्व साहित्य
एकत्र करून घ्या.
2.मग त्यात तेल गरम करून घालावे .
3. गरम पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा करून घ्यावा.
4.मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे.
5. त्यांना इडलीसारखा आकार द्यावा.
6. सर्व गोळे इडलीच्या भाड्यात एक लोटी/तांब्या पाणी घालून वरती एक इडलीचीच ताटली ठेवून त्या वरती सर्व गोळे ठेवून अर्धा तास फुल गॅसवरती ठेवून त्यांना शिजवून घ्यावे, नंतर गॅस बंद करावा.
7. मग त्या गोळ्यांचे चार तुकडे करून घ्यावेत.
8. मग त्या तुकड्यांना तेलात किंवा तुपात सोनेरी रंगावर मध्यम गॅसवर तळुन घ्यावे.
9. मग गरमागरम वरणासोबत खमंग "डाळ बट्टी" सर्व्ह करावी .
डाळ/वरण/सांबार :
साहित्य :• तुरीची डाळ शिजवून - १ वाटी
• टोमॅटो - १ (बारीक चिरून)
• छोटे कांदे - २ (बारीक चिरून)
• लसूण पाकळ्या - ७ ते ८
• कढीपत्ता पान - १० ते १२
• बाकी सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यावे - फूल कोबी, पान कोबी, शिमला मिरची, गाजर, श्रावण
घेवडा/फ्रेंचबीन
• गुळ - ०.५ वाटी किंवा साखर - ५ टेबलस्पून ( आवडीनुसार)
• मीठ - चवीनुसार
• तेल - २ टेबलस्पून (फोडणीसाठी)
• मोहरी - १ टि स्पून (फोडणीसाठी)
• हिंग (फोडणीसाठी)
• जिरे - १ टि स्पून (फोडणीसाठी)
• तिखट - २ टीस्पून (आवडीनुसार)
• हळदी पावडर - ०.५ टीस्पून
• गरम मसाला - २ टीस्पून
• कोथिंबीर
कृती :
1.गॅस वरील भांड्यात फोडणीसाठी तेल घालून घ्यावे.
2.मग त्यात मोहरी, जिरे व हिंग घालावा. (फोडणी)
3.मोहरी तडतडल्यावर त्यात कांदा व कढीपत्ता घालावा.
4. कांदा सोनेरी झाल्यावर टोमॅटो व इतर भाज्या घालून
थोड्या वेळ झाकण ठेवून वाफ आणावी.
5.मग त्यात सर्व मसाले व गुळ घालुन परत एकदा वाफ
आणावी.
6.मग त्यात शिजलेली तुरीची डाळ आणि आवश्यक
तेवढे पाणी घालून वरण उकळुन घ्यावे
7.कोथिंबीर घालून " गरमागरम डाळ खमंग बट्टी " सोबत सर्व्ह करावे.
टीप :
1. डाळ/वरण/सांबार मध्ये आवडीनुसार तुप टाकूनखाल्ले तर ते चविष्ट लागते आणि पौष्टिक असते.
2.बट्टया २ ते ३ दिवस चांगल्या राहतात.
**जर माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रिय जनानं व मित्रांना शेयर करा.
**या रेसिपी मध्ये काही शंका असल्यास खाली कमेंट करा.
**अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज साठी या ब्लॉग ला फॉलो करु शकता. तुम्ही मला ईन्स्टाग्राम वर देखील फॉलो करु शकता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा